मुंबई- गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी प्रशासान ७ विशेष ट्रेन सोडणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनासाठी हजारो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे दरवर्षी रेल्वे प्रशासन विशेष गाड्यांचे आयोजन करते. दरवर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष ७ ट्रेन सोडणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण रविवारी २१ जुलै पासून सकाळी ८ पासून सुरू होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू आता होईल. त्यांना रेल्वेसाठी काही महिने आधीच बुकिंग करावे लागते. प्रवाशांची हीच गरज लक्षात घेऊन रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग मेपासूनच सुरू करण्यात आले होते.