इचलकरंजी शहरात भटक्या घोड्यांचा वाहतुकीला अडथळा

इचलकरंजी- शहरातील रस्त्यांवर आता भटकी कुत्री आणि गायींपाठोपाठ आता भटके घोडे दिसू लागले आहेत. रस्त्यावर कळपाने फिरणाऱ्या या घोड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

इचलकरंजी शहरातील राधाकृष्ण चौक,कापड मार्केट परिसर तसेच स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर भटक्या घोड्यांचा कळप वावरताना दिसत आहे.गेल्या १० ते १२ दिवसांपासून फिरणारा हा कळप वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे. या कळपामध्ये दहा-बारा घोडे असून हे घोडे रस्त्यावरील वाहनांना धडकण्याच्या घटना घडत आहेत. एकमेकांचा पाठलाग करत हे घोडे धावत असल्याने नागरिकांच्या जीवितालाही या घोड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.पालिका प्रशासनाने या भटक्या घोड्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top