नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदार संघातून पराभूत झाल्याने त्यांचे मंत्रिपदही गेले. त्यामुळे त्यांना दिल्लीतील सरकारी बांगला रिकामा करावा लागला आहे.स्मृती इराणी मागील एनडीए सरकारमध्ये मंत्री असल्याने गेल्या १० वर्षांपासून त्या नवी दिल्लीतील, २८ तुगलक क्रिसेंट येथील सरकारी बंगल्यात राहात होत्या. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा अमेठी मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी दीड लाखाहून अधिक मतांनी पराभव केला . पराभूत मंत्र्यांना ११ जुलैपर्यंत सरकारी बंगले रिकामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार स्मृती इराणी यांनी आज बंगला रिकामा केला.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |