पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यात केळी,सुपारी, नारळ आणि काजूच्या बागायती मोठ्या प्रमाणात केली जाते.इथल्या एका शेतकर्याच्या केळी बागेत तब्बल ४.५ ते ५ फूट लांबीचे केळीचे घड लगडलेले दिसत आहेत.
सत्तरी तालुक्यातील खोडये गावातील कृष्णप्रसाद गाडगीळ यांनी प्रयोग म्हणून दहा टिश्यू पध्दतीची जी- ९ या जातीच्या केळीची लागवड केली होती.त्यातील पाच झाडांना केळी बहरली असून सुमारे ४.५ ते ५ फूटाचे घड लगडलेले आहेत.
एकेका घडाचे वजन ४० ते ४५ किलोचे आहे. एका घडाला ७०० ते ७५० केळी आहेत.कृष्णप्रसाद म्हणाले की, आपण अन्य बागायती पिके देखील घेतोच.त्यात केळीच्या स्थानिक गोव्यातील पसंतीच्या जातीही आहेत. त्यालाच जोड म्हणून मी टिश्यू प्रचार पद्धतीच्या केळीच्या जातीची लागवड केली. त्यात चांगले उत्पादन मिळाले आहे.