चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत क्षेत्र पुढील तीन महिन्यांसाठी पर्यटकांना बंद करण्यात आले आहे. काल शेवटच्या दिवशी सोनम वाघीण व तिच्या ३ बछड्यांनी पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिल्यामुळे पर्यटकांचा हा शेवटचा दिवस सार्थकी लागला.
चंद्रपूर येथील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत क्षेत्र म्हणजे कोअर भागात १ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात पर्यटन बंद केले जाते. या भागातील रस्ते पावसाने निसरडे झाले आहेत . त्याचप्रमाणे प्राण्यांचा प्रजननाचा मोसम असल्याने त्यांना त्रास होऊ नये यासाठी हे पर्यटन बंद ठेवले जाते. व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या अनेक पर्यंटकांना त्याची महिती असल्याने ते शेवटच्या आठवड्यात व त्यातही शेवटच्या दिवशी इथे मोठ्या संख्येने गर्दी करतात. शेवटच्या दिवशी तरी व्याघ्र दर्शन व्हावे ही अनेक पर्यटकांची इच्छा काल सोनम वाघीणीने व तिच्या बछड्यांनी पूर्ण केली. आता हा व्याघ्र प्रकल्प १ ऑक्टोबर पासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे.