स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणा संदर्भातील याचिकेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. आता ही सुनावणी थेट १६ एप्रिलला होणार आहे. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतची सुनावणी आता थेट लोकसभा निवडणुकानंतरच होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रकरणाची सुनावणी यापूर्वी ९ जानेवारीला होणार होती. त्यानंतर ही सुनावणी ४ मार्चला होणार होती. मात्र त्यापूर्वीच नवी संभाव्य तारीख समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत सुनावणीची संभाव्य तारीख १६ एप्रिल दाखवण्यात आली आहे. यापूर्वीही ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, १६ एप्रिलपर्यंत लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक घोषित होण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभा निवडणुका काही टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुका झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेता येणार नाहीत, ही अडचण पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीच्या नंतरच होतील, अशी शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top