दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता कोण आहेत? जाणून घ्या

Palette Creation
+91 9930666001

———- Forwarded message ———
From: officialmarathiwriter <officialmarathiwriter@gmail.com>
Date: Thu, 20 Feb 2025 at 3:51 PM
Subject: Navakal Articles – 20/2/25
To: <palettec.ind@gmail.com>
Cc: Raamesh Gowri Raghavan <iambecomedeath@gmail.com>, <rohit@navakal.in>

1. Apple चा धमाका, कमी किंमतीत येणारा iPhone 16e भारतात लाँच

Apple ने भारतात आपला नवीन हँडसेट iPhone 16e मॉडेलला लाँच केले आहे. कंपनी लवकरच iPhone SE 4 लाँच करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, कंपनीने iPhone SE 4 ऐवजी स्वस्त iPhone 16e मॉडेलला सादर केले आहे. कंपनीने ग्राहकांसाठी कमी किंमतीत येणारे iPhone 16 सीरिजमधील नवीन मॉडेल उपलब्ध करून दिले आहे. या फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

iPhone 16e ची किंमत

Apple ने iPhone 16e चे बेस 128GB व्हेरिएंटची अमेरिकेत $599 (अंदाजे 49,500 रुपये) किंमतीत लाँच आहे. तर भारतात या मॉडेलची किंमत  59,900 रुपये आहे. iPhone 16e च्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये आहे, तर 512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 89,900 रुपये मोजावे लागतील. नवीन iPhone 16e साठी प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारीपासून सुरू होईल, तर डिलिव्हरी 28 फेब्रुवारीपासून सुरू होईल.

iPhone 16e चे स्पेसिफिकेशन्स

iPhone 16e मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले असून, यात फेस आयडी सिस्टीमसाठी नॉच देण्यात आला आहे. स्क्रिनचे रिझॉल्यूशन 2532×1170 पिक्सल, ब्राइटनेस 1200 निट्स ब्राइटनेस आहे. नॉच सुरक्षित फेसियल रिकॉग्निशन प्रदान करते. या फोनमध्ये पारंपरिक म्युट स्विचऐवजी अ‍ॅक्शन बटण देण्यात आले आहे.

अ‍ॅक्शन बटणाच्या मदतीने युजर्स कॅमेरा सुरू करणे किंवा ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोड सुरू करू शकतात. याशिवाय, Apple ने iPhone 16e मध्ये USB-C पोर्ट देखील दिला आहे. ॲपलच्या iPhone 16e मध्ये A18 चिप दिली आहे. फोन आयओएस 18 वर काम करतो.

कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ड्युअल सिम, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.3, रीडर मोड सह NFC, GPS, ग्लोनास, गॅलीलियो, QZSS आणि BeiDou सारखे फीचर्स दिले आहेत. iPhone 16e मध्ये Apple Intelligence सपोर्ट दिला आहे, जे AI-आधारित फिचर्सचा संप्रदान करते. यामध्ये Genmoji, Writing Tools, आणि ChatGPT इंटिग्रेशन यांसारखी टूल्स दिले आहेत.iPhone 16e मध्ये फोटोग्राफीसाठी 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

Tags – iPhone 16e, Apple

2. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता कोण आहेत? जाणून घ्या

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून भाजप (BJP) नेत्या रेखा गुप्ता यांनी शपथ घेतली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर पार पडलेल्या कार्यक्रमात रेखा गुप्ता यांनी शपथ घेतली. दिल्लीत जवळपास 27 वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. 1998 मध्ये भजप नेत्या सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी ‘आप’च्या वंदना कुमारी यांचा 29 हजार मतांनी  मतांनी पराभव केला होता. वंदना कुमारी या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबतच, 6 नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

कोण आहेत रेखा गुप्ता?

रेखा गुप्ता यांचा जन्म 1974 मध्ये हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथे झाला. लहानपणापासूनच त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सोबत जोडल्या गेल्या.  त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीकॉम आणि एलएलबी केले आहे. 1998 मध्ये त्यांचा विवाह दिल्लीतील मनीष गुप्ता यांच्यासोबत झाला.

रेखा गुप्ता यांनीने 1992 मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीच्या दौलत राम कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरूवात केली. 1996-97 मध्ये त्या डूसूच्या (DUSU) अध्यक्ष झाल्या.

2007 मध्ये रेखा गुप्ता दिल्लीतील पीतमपुरा (उत्तर) येथून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 2012 मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या आणि नंतर दक्षिण दिल्ली नगर निगम (SDMC) च्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळली.  रेखा गुप्ता दिल्ली भाजपा महिला मोर्चाच्या जनरल सेक्रेटरी देखील राहिल्या आहेत.  2004 ते 2006 दरम्यान, त्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिवपदी कार्यरत होत्या.