नवी मुंबई – खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये ३ मे ते ११ मे ह्या दरम्यान वेबिनार मालिका घेण्यात आली. डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग या विषयांवर ही वेबिनार मालिका आधारित होती. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. सिंधू तायडे आणि प्राध्यापक निलेश बा.पाटील सर यांच्या संयुक्त विद्यमाने ही वेबिनार मालिका आयोजित केली गेली होती.
या ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये प्रथम वर्ष आणि फायनल इयर इंजीनियरिंग शाखेचे 200 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स या आधुनिक विषयांबद्दल माहिती देण्यात आली. जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात याचा लाभ होईल. या वेबिनारचे मुख्य व्यक्ते व प्रमुख पाहुणे अर्पित यादव होते. अर्पित यादव हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विषयाचे तज्ज्ञ आहेत. ते सध्या हैदराबाद येथील टेनसर ब्रीव कंपनीत कार्यरत आहेत. ते पायथोन, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस चे कॉर्पोरेट ट्रेनर सुद्धा आहेत. नुकताच त्यांना व्ही.डी. गुड इन्स्पिरेशनल सायंटिस्ट अवॉर्ड ऑन इंजिनिअरिंग, सायन्स अँड मेडिसिन मिळालेला आहे.
तसेच शेवटच्या दिवशी रूपा सिंग, संस्थापक – ए.आय. बी-हाइव यांनी या अनोख्या क्षेत्रातील व्यावसायिक संधी व नोकरीच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शन देऊन या मालिकेची सांगता केली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या एफ.ई, विभाग प्रमुख डॉ.सायली चौधरी, डीन डॉ.शितल बुक्कावार आणि प्रिन्सिपल डॉ. मंजुषा देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.