राज्यात १ नोव्हेंबरपासून धान्य वाटप बंद आंदोलन

सातारा – स्वस्त धान्य दुकानदारांच्या काही मागण्या आहेत. ज्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. परंतु यावर अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही.त्यामुळे आता स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत १ नोव्हेंबरपासून रेशन वाटप बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ आणि ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स राज्य संघटनेच्या अमरावती येथे झालेल्या मेळाव्यात हा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.यावेळी राज्यातील २८ जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, तालुक्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी,दुकानदार बंधू-भगिनींसह ६५७ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष यांनी रेशन व्यवसायासंबंधित येणाऱ्या
अडचणींबाबत व पुढील
आंदोलनाचे धोरण ठरवण्याबाबत आपले विचार मांडले.गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या मागण्यांबावत,कमिशन वाढीबाबत शासनाचे लक्ष वेधून घेणे तसेच मागण्या मान्य होईपर्यंत १ नोव्हेंबर पासून धान्य वाटप बंद आंदोलन करण्याबाबत एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top