ठाणे- बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज मुंब्य्रात मुस्लीम बांधवानी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनात “हिंदू बांधवांचे रक्षण करा”,असे फलक झळकवत आंदोलक मुस्लीमांनी बांगलादेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मौलाना अब्दुल वहाब यांनी सांगितले की, बांगलादेश येथील हिंदू लोकांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेशच्या युनुस सरकारवर दबाव आणावा. बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवरही अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलून आमच्या हिंदू बांधवांचे रक्षण करावे.