Home / Uncategorized / 6 वा मजला अस्वस्थ निकालाची चर्चा सुरू

6 वा मजला अस्वस्थ निकालाची चर्चा सुरू

मुंबई – मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असणार्‍या अधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दबक्या आवाजात तिथे राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालाची...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असणार्‍या अधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दबक्या आवाजात तिथे राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालाची चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही येऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात सध्या चलबिचल सुरू आहे. काही अधिकार्‍यांनी आता इतरत्र पोस्टिंगसाठी चाचपणी करायला सुरुवात
केली आहे.
शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या याचिकांवर गेल्या आठ महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यातील एक न्यायाधीश 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे तत्पूर्वी निकाल येणार आहे. परिणामी शिंदे गटातील अस्वस्थता वाढली आहे. आम्ही आता आवराआवर सुरू केली आहे, अशी मुख्यमंत्री कार्यालयात बोलले जात असल्याची चर्चा आहे. नवीन निर्णय आता घ्यायचे नाहीत आणि जे निर्णय आधी घेतले ते निर्णय गतीने मार्गी लावायचे अशी मानसिकता आहे. खासकरून आर्थिक विषयाच्या निर्णयांना प्राधान्य दिले जात आहे. भाजपमध्ये मात्र शांतता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असा दावा शिंदे गट करीत आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या