230KM रेंजसह येणारी सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार, किंमत 7 लाखांपासून सुरू; पाहा फीचर्स

MG Comet EV : भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. 10 लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळते. यापैकीच एक इलेक्ट्रिक कार MG Comet ही आहे. या कारला लाँच केल्यापासून भारतीय ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही देखील 10 लाखांच्या बजेटमध्ये येणारी नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल MG Comet चा विचार करू शकता. MG Comet EV च्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी जाणून घेऊयात.

MG Comet EV ची किंमत

MG Comet EV भारतीय बाजारात तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. कार 100YR Edition, Executive आणि Excite या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असून, याची किंमत अनुक्रमे 9,83,800 रुपये, 6,99,800 रुपये आणि 8,20,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

MG Comet EV चे स्पेसिफिकेशन्स

MG Comet EV मध्ये 17.3kWh लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. यात दिलेली इलेक्ट्रिक मोटर 41.42 bhp पॉवर आणि 110 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 230 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. कॉमेट ईव्हीमध्ये 3 ड्राइव्ह मोड आणि 3 KERS मोड्स दिले आहेत.

या कारमध्ये 4 जण सहज बसू शकतात. कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्टसह येणारी 10.25 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, iSmartटे क्नोलॉजी सपोर्टसह 55 पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स, 100 पेक्षा अधिक व्हॉइस कमांड्स, ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ABS सह EBD, फ्रंट आणि रियर 3-पॉइंट सीट बेल्ट्स, रियर पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ISOFIX चाइल्ड सीट, स्मार्ट स्टार्ट सिस्टम, डिजिटल ब्लूटूथ सारखे अनेक फीचर्स मिळतील. या इलेक्ट्रिक कारला 3.3 किलोवॉट चार्जरच्या मदतीने 7 तासांत पूर्ण चार्ज करता येईल.