बडोदा- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांचा आज बडोदा सांचेझ येथे दोन कुलोमीटरचा रोड शो केला . यावेळी दोन्ही नेत्यांच्या हस्ते टाटा एअरबसच्या असेंब्ली युनिटचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी देशातील १५०० उद्योगपतींना आमंत्रण होते.
उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी उद्योगपतींना संबोधित केले. आज पंतप्रधानांच्या हस्ते २,८०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. उद्घाटन होणाऱ्या प्रकल्पांमध्ये तीन हायवे तसेच जुनागड बायपासच्या विविध विभागांचे चौपदरीकरणाचा समावेश आहे.
जामनगर जिल्ह्यातील ध्रोळ बायपास ते मोरबी जिल्ह्यातील आमरणपर्यंतच्या उर्वरित भागाच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. अमरेली येथील दुधाळा येथे पंतप्रधान भारत माता सरोवरचे उद्घाटन झाले. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पिपीपी) मॉडेल अंतर्गत गुजरात सरकार आणि ढोलकिया फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प विकसित करण्यात येतो आहे.एका सार्वजनिक कार्यक्रमात, पंतप्रधान मोदींच्य् हस्ते गुजरातमधील अमरेली पिरसरातील सुमारे ४,९०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. या प्रकल्पांचा राज्यातील अमरेली, जामनगर, मोरबी, देवभूमी द्वारका, जुनागड, पोरबंदर, कच्छ आणि बोताड जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार आहे.