शेअरबाजार सेन्सेक्स ४ अंकानी घसरला

मुंबई – आजचा दिवस शेअर बाजारासाठी फारसा उत्साहजनक राहिला नाही.सकाळी सुरुवातच धिम्या गतीने झाली.दिवसभर बाजारात मंदीचे वातावरण होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४ अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १ अंकाच्या वाढीसह बंद झाला.बँक निफ्टीमध्ये मात्र आज २५० अंकांची वाढ झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी दिवसभरात चांगली वाढ नोंदवली. दिवसभरातील व्यवहारांत औषध निर्मिती कंपन्या आणि ग्राहकोपयोगी वस्तुंची विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली.