बुलंद शहरात भीषण अपघात ८ जणांचा मृत्यू २१ जखमी

बुलंद शहर – उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात आज सकाळी पिकअप व खाजगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले. जखमींना अलीगढच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही धडक इतकी जोरदार होती की ५ जणांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला.शिकारपूरहून बुलंदशहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. अलीगढच्या अंतरौली तालुक्यातील रायपूर खास अहिर नागला गावातील ४० जण एका पिकअपमधून गाझियाबादहून अलीगढ कडे जात होते. हे सर्वजण बुलंद शहराच्या बिस्टानिया डेल्टा फूड कंपनीचे कर्मचारी असून ते रक्षाबंधनासाठी आपल्या गावी जात होते. त्यांची पिकअप सलेमपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत आली असता या पिकअपला एका खाजगी बसने धडक दिली. या पिकअपमधील ५ जणांचा जागीच तर ३ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात २१ जण जखमी झाले असून सर्व मृत व जखमी हे पिकअपमधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top