बिबट्याचा घरात घुसून झोपलेल्या महिलेवर हल्ला

चंद्रपूर- बिबट्याने घरात घुसून झोपलेल्या महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना काल पहाटे चारच्या सुमारास मूल तालुक्यातील शिवापूर चक येथे घडली.वंदना परशुराम निमगडे (४६) असे जखमी महिलेचे नाव आहे.

शिवापूर चक हे गाव ताडोबा बफर झोनमध्ये येत असून, या भागात वाघ,अस्वल आदी वनप्राण्यांचा वावर आहे. हे गाव जंगलालगत असल्यामुळे येथील गावकरी नेहमीच दहशतीच्या वातावरणात जगतात. काल परशुराम निमगडे कुटुंब झोपले असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घरात घुसून वंदना निमगडे या महिलेवर हल्ला केला. घराजवळ कुत्र्यांची आरडाओरड सुरू झाल्यामुळे सर्वजण झोपेतून जागे झाले.तेव्हा त्यांना पत्नी वंदना हिच्यावर बिबट्या हल्ला करीत असल्याचे दिसले.त्यांनी आरडाओरड करताच बिबट्या पळून गेला.या घटनेची माहिती त्यांनी मूल वनविभागागला दिली असता वनाधिकार्‍यांनी घरी येवून घटनेचा पंचनामा केला व जखमी महिलेला उपचारासाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top