नुहमधील जलाभिषेक यात्रा २ हजार जवान तैनात

चंदीगड – हरयाणातील नुह मध्ये मागील वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी ब्रजमंडळ जलाभिषेक यात्रेसाठी राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी २ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर आजपासूनच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांच्या जोडीला एसआरपी व सीआरपीएफच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी ३१ जुलैला हरयाणाच्या नुहमध्ये ब्रज मंडल जलाभिषेक यांत्रेदरम्यान दंगल होऊन त्या दंगलीत ५ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. त्यानंतर नुहमध्ये वातावरण तणावपूर्ण होते. त्यामुळे हरियाणा सरकारने यावेळी विशेष खबरदारी म्हणून सोमवारी यात्रेदरम्यान २ हजार जवान तैनात केले आहेत. तसेच यात्रेच्या मार्गावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. अरावली पर्वतावर कमांडो , डॉग स्क्वाड बरोबरच घोडेस्वार पोलिसांचे पथकही तैनात करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top