दुर्गा मुख्यमंत्री…. जानकी रामचंद्रन, तामिळनाडू

राज्यातील सर्वोच्चपदी म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून राज्याचा गाडा हाकण्याचा मान देशातील मोजक्या कर्तृत्त्ववान महिलांना मिळाला. नवरात्रीच्या निमित्ताने या राजकारणातील मुख्यमंत्री राहिलेल्या दुर्गांची ओळख करून देणारी ही अनोखी माळ.

जानकी रामचंद्रन, तामिळनाडू
तामिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्ही. एन. जानकी उर्फ जे. जानकी यांना पती एमजी रामचंद्रन यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रिपद मिळाले. मात्र हे पद औट घटकेचेच ठरले. कारण 7 जानेवारी 1988 ते 30 जानेवारी 1988 अशा अवघ्या 23 दिवसांतच त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र, सिनेअभिनेत्री असलेल्या देशातील
त्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या. शिवाय कुठलीही निवडणूक न लढवता या मुख्यमंत्री बनण्याचा मानही त्यांना मिळाला. तसा राजकारणात त्यांचा प्रवेश अचानकच झाला.
1984 मध्ये राजकारणात फारशा सक्रिय नसलेल्या जानकी यांनी एम. जी. रामचंद्रन यांच्या आजारपणानंतर राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली. 1987 मध्ये एम. जी. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसल्या. मात्र, विश्वासदर्शक ठरावावेळी 194 आमदार असलेल्या अण्णा द्रमुक पक्षाचे तीन
तुकडे पडले. 101 आमदारांच्या एका गटाने जानकी यांना समर्थन दिले. तर 30 आमदारांच्या दुसर्‍या गटाने जयललिता यांना पाठिंबा दिला. तिसरा गट तटस्थ राहिला. विधानसभेत प्रचंड गरादोळात हा विश्वासदर्शक प्रस्ताव त्यांनी जिकला खरा, पण दिल्लीतील 23 दिवसांत राजीव गांधी यांच्या सरकारने जानकी यांचे सरकार बरखास्त केले. पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्या राजकारणातून दूर फेकल्या गेल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top