दक्षिण कोरियातील काकाओ कंपनीच्या संस्थापकांना अटक

सेओल-काकाओ कॉर्पोरेशन या इलेक्ट्रॉनिक आणि मेसेजिंग तसेच ऑनलाईन सुविधा क्षेत्रातील कोरियाच्या सर्वात मोठ्या कंपनीच्या संस्थापकाला अटक केली असल्याची माहिती दक्षिण कोरिया प्रशासनाने दिली आहे. गेल्या वर्षी एका कंपनीच्या अधिग्रहण प्रक्रियेत केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.गेल्या वर्षी काकाओ कॉर्पोरेशन कंपनीचे संस्थापक किम यांनी एस एम इंटरटेंनमेंट या कंपनीचे अधिग्रहण करतांना खासगी इक्विटी फंडामध्ये आर्थिक गैरव्यवहार करुन एस एम कंपनीच्या शेअर्रचे दर कमी केले. त्याचबरोबर या कंपनीच्या अधिग्रहण प्रक्रियेत त्यांनी अनेक योजनांचा व सवलतींचा फायदा उचलला. त्यानंतर त्यांनी कमी किंमतीत एसएम इंटरटेंनमेंट ही कंपनी विकत घेतली. किम यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.