तायपैई- तैवानच्या समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी चीनी वायुदलाच्या सहा विमानांनी घिरट्या घातल्या. नौदलाची ७ जहाजेही समुद्रात दिसल्याची माहिती तैवान लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे.
तैवानच्या लष्करी सूत्रांनी एक्सवर पोस्ट करुन ही माहिती दिली की, आज सकाळी दोन लष्करी विमानांनी भूमध्य भागात फेरी मारली व तैवानच्या दक्षिणपूर्वेकडील भागातील हवाई हद्दीत घुसखोरी केली. आम्ही चीनी सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. तैवानच्या अनेक भागात चीनी लष्करांच्या कारवाया वाढल्या आहेत. चीनची ७ जहाजे तैवानच्या समुद्रीसीमेजवळ फिरत आहेत. तैवान १९४९ साली स्वतंत्र झाला तरी तो आपलाच भाग असल्याचा दावा चीन करत आहे. चीनच्या वाढत्या हालचालींमुळे तैवानच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला आहे.