गणेश मंडळांनी रस्त्यातील खड्ड्यांची माहिती पालिकेला द्यावी

*समन्वय समितीचे आवाहन

मुंबई- मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीचे आगमन ११ ऑगस्टपासून होणार आहे . लालबाग, परेल येथील गणेश मूर्ती कारखान्यातून होणार आहे. मात्र तत्पूर्वी आपल्या गणेश मूर्तीच्या आगमन रस्त्यातील खड्ड्यांबाबतची माहिती संबंधित पालिका वॉर्ड व पोलीस ठाण्यात द्यावी,असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे.

गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व गणेश मंडळांना आवाहन केले आहे की,ज्या रस्त्यावरून आपल्या मंडळाच्या मूर्तीचे आगमन होणार आहे,त्या रस्त्याची पाहणी करण्यास आपल्या कार्यकर्त्यांना सांगावे.त्याचप्रमाणे रस्त्याच्या आसपास कुठे झाडाच्या फांद्या किंवा केबल,वायर आगमनात अडथळा ठरत आहे का याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.विशेष म्हणजे आगमनापूर्वी आपण केलेल्या तक्रारींचे निर्मूलन केले जाईल,असे आश्वासन पालिकेच्या बैठकीत अधिकार्‍यांनी दिलेले आहे. तरी आगमन रस्त्याबाबतची माहिती संबंधित वॉर्ड, पोलीस स्टेशन तसेच वाहतूक विभागाला देण्यास टाळाटाळ करू नये,असेही समितीने आपल्या आवाहन पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top