अदानी एनर्जीने ४०९१ कोटींचा खवडा प्रकल्प घेतला ताब्यात

नवी दिल्ली- अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या देशातील सर्वात मोठ्या खाजगी ट्रान्समिशन आणि वितरण कंपनीने सुमारे ४०९१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा खवडा फेज-४ भाग-अ प्रकल्पाचे एसपीव्ही ताब्यात घेतले आहे. या प्रकल्पाच्या जोडणीमुळे देशाच्या ऊर्जा संक्रमणामध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून अदानी एनर्जीचे स्थान अधिक मजबूत झाले आहे, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे

पुढील २४ महिन्यांत गुजरातमधील हा खवडा प्रकल्प ‘ बूट ‘ म्हणजे म्हणजे ‘बांधा,स्वतः करा, चालवा आणि हस्तांतरित करा,’ या तत्वावर सुरू केला जाणार आहे.सुमारे २९८ किमी लांबीच्या या खवडा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अदानी एनर्जी ४०९१ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.यातून ७ गिगावॅट अक्षय ऊर्जा पारेषण नेटवर्क तयार जाणार आहे.खवरा आयव्हीए ट्रान्समिशन लाइन,नॅशनल ग्रीडचा एक भाग,खवडा ते लक्रिया आणि खवडा ते भुज या ७६५ केव्ही दुहेरी सर्किट लाईनला जोडून आणि ४,५०० एमव्हीएची पारेषण क्षमता स्थापित करून गुजरातमध्ये ७ गिगावॅट अक्षय ऊर्जा वापरण्यात मदत करणार आहे.खवडा आरई पार्क हे जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा उद्यान आहे. ५३८ स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेले हे पार्क फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या ५ पट आहे. सौर आणि पवन ऊर्जेद्वारे त्याची उत्पादन क्षमता ३० गिगावॅट इतकी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top