नवी दिल्ली – २३ ऑगस्ट २०२३ मध्ये भारताचे चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. या ऐतिहासिक घटनेला २३ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा दिवस राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. देशातील सर्व नागरिकांनी या दिवशी इस्रोच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी केले.