मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींचा असा कोणताही कार्यक्रम नाही असे म्हणत या भेटीबाबतची शक्यता तूर्तास तरी फेटाळून लावली आहे.राहुल गांधी मुंबई मध्ये येऊन उध्दव ठाकरेंची भेट घेणार नाहीत . मात्र त्यांच्या मधील दुवा म्हणून सोमवारी सायंकाळी वेणुगोपाल उध्दव ठाकरेंची भेट घेणार आहेत . आवश्यकता भासल्यास मल्लिकार्जुन खर्गे मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांना भेटतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या मुंबई मधील निवास स्थानी सिल्वर ओकला गेले होते.. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांना मुंबईत यावे याबद्धल काँग्रेस नेते राजी नाहीत .त्यातच सावरकर मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रात सुरु झालेले राजकारण पाहता सध्यातरी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे ही भेट शक्य नसल्याचे म्हटले जाते .