परवानगी शिवाय गाणे वापरल्याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर खटला

‘मी परत येईन’ या वाक्याने गेल्या वेळेसची महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक गाजली होती. याचसारखा प्रकार अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झाला आहे. ‘थांबा मी येतोय’ हे सुप्रसिद्ध गायक आयझक हाईस यांचे गाणे विनापरवानगी वापरल्याबद्दल अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे.
सध्या अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी रॅलींवर भर दिला आहे.

या रॅलींमध्ये ते सुप्रसिद्ध दिवंगत गायक आयझेक हायस याचे ‘होल्ड ऑन आय एम कमिंग’ हे गाणे वापरतात. प्रेरणादायी शब्द व संगीत असलेले हे गीत अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय आहे. या गाण्याचा वापर कोणत्याही परवानगीशिवाय केल्याचा आरोप हाइस यांच्या कुटुंबियांनी केला आहे. हाइस ३ यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली असून ट्रम्प हे वंशवादी असून त्यांच्या मनात स्त्रियांविषयी आदर नाही असा आरोपही केला. या संदर्भात हाईस यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून ट्रम्प आपल्या रॅलीमध्ये हे गाणे वापरत असून तो कॉपीराईट कायद्याचा भंग आहे. आम्ही त्यांना अनेकवेळा या बाबतीत कळवले असले तरी त्यांनी संपर्क साधला नाही. त्यामुळे हा दावा दाखल करत आहोत. त्यांनी जर येत्या आठ दिवसात प्रतिक्रिया वा आर्थिक भरपाई करण्याची तयारी दर्शवली नाही तर आमचे वकील हे प्रकरण पुढे नेतील. आपल्या गाण्याने आपण ट्रम्प यांना पाठिंबा देत आहोत असा संदेश जाऊ नये यासाठीही हा खटला दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top