अबुजा – नायजेरियाच्या निगार राज्यातील अगाई विभागात इंधनाचा ट्रक दुसऱ्या एका ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात ४८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात ५० गुरेढोरेही होरपळून मरण पावले आहेत.नायजेरियाच्या महामार्गावरुन हा इंधनाचा ट्रक जात असतांना तो जवळून जाणाऱ्या एका ट्रकवर आदळला. या ट्रकमध्ये काही माणसे व ५० हून अधिक गुरंढोरं होती. धडक बसल्याबरोबर इंधनाच्या ट्रकचा स्फोट झाला. या स्फोटामुळे जनावरांच्या ट्रकमधील माणसे व जनावरांचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले. नायजेरियामधील मालवाहतूकीसाठी रेल्वेसेवा उपलब्ध नसल्यामुळे अशा प्रकारचे अनेक अपघात होत असतात.
नायजेरियात इंधन टँकरच्या अपघातात ४८ जणांचा मृत्यू
