धावपटू कविता राऊतचा थेट कोर्टात जाण्याचा इशारा

पुणे- सावरपाडा या आदिवासी पाड्यावरील आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात आली आहे. तिची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.मात्र, या नियुक्तीवर ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत नाराज आहे.मला ललिता बाबरप्रमाणे उपजिल्हाधिकारी पद मिळायला हवे असे तिचे म्हणणे आहे.एव्हढेच नाही तर तिने या अन्यायाविरुद्ध राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात देशाबरोबरच महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंची राज्य शासनाने सरकारी नोकरीत थेट नियुक्ती केली. कविता राऊत हिच्यासह १५ जणांना सरकारी नोकरीत मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती मिळाली आहे, मात्र या नियुक्तीवर कविता राऊत नाराज आहेत.कविता राऊत म्हणाली की,गेल्या १० वर्षांपासून संघर्ष करूनही मला न्याय मिळाला नाही. माझ्याबरोबर ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणाऱ्या ललिता बाबरला एक न्याय आणि मला दुसरा का? दहा वर्षांपासून अनेक खात्यात नोकरीची फाइल पुढे जाते, मात्र अर्थ खात्यात फाइल अडवली जात आहे. त्यामुळे आपण राज्य सरकारविरोधात न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे, असेही तिने यावेळी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top