काठमांडू- नेपाळची राजधानी काठमांडूत त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी अकराच्या सुमारास सौर्य एअर लाईन या खाजगी कंपनीचे विमान उड्डाण घेत असताना कोसळले आणि आग लागली. या विमानात एकूण १९ प्रवासी होते. त्यात १७ सौर्य एअरलाइन्सचे कर्मचारी होते, तर उर्वरित २ क्रू मेंबर होते. विमानाच्या भीषण अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला तर पायलट गंभीर जखमी आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर लगेच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने विमानाची आग विझवून बचावकार्य केले.
काठमांडू पोखरा विमान कोसळले ! १८ जणांचा मृत्यू ! पायलट जखमी
