आज अजिंठा गावात बाबा ताजोद्दिन सरकारचा संदल

सिल्लोड – तालुक्यातील अजिंठा गावात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बाबा ताजोद्दिन सरकारचा संदल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम उद्या २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ होणार आहे.

या कार्यक्रमात अजिंठा गावातील सांडू बशीर तडवी आणि शकील सांडू तडवी यांच्या घरापासून उद्या दुपारी ३ वाजता भव्य संदल मिरवणूक निघणार आहे. ढोल ताशांच्या गजरात निघणारी ही मिरवणूक संदर दर्ग्यामध्ये पोहचल्यानंतर दुपारी ४ वाजता संदल चढवला जाईल.तरी सर्व स्तरातील भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top