अथेन्सला वणव्याची आग पोचली नागरिक सुरक्षित स्थळी हलविले

अथेन्स – अथेन्स शहराच्या उपनगरात शेजारच्या जंगलातील वणव्याची आग पोहोचली . त्यामुळे येथील परिस्थिती धोकादायक झाली आहे. शहरातील कार्यालये व शाळा बंद असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.ग्रीसच्या ईशान्येकडील अफ्रिकन विभागाच्या जंगलातील वणवा पसरत अथेन्सच्या काही उपनगरांपर्यंत आला. सुरक्षा म्हणून अनेक परिसर रिकामे करण्यात आले. या वणव्याच्या भितीने येथील कार्यालये व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. अथेन्सच्या अग्निशमन दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सध्या जगंलातून शहरात येणारा वणवा आटोक्यात आला असला तरी शहरातील काही भागात अद्याप आगीच्या ज्वाळा पेटत्या आहेत. त्यांच्यावर लवकरच नियंत्रण मिळवले जाईल. अथेन्स जवळच्या मॅरेथॉन व पेंटेली या शहरातील काही भागात अद्याप आग धुमसत आहे. काही भागांना नव्याने आगी लागण्याचा धोकाही कायम असून त्यासाठी अग्निशमन दल सज्ज आहे. सध्या अग्निशमन दलाकडे ७०० जवान, १९९ आगीचे बंब तसेच ३५ पाणी बरसणारी विमाने तयार ठेवण्यात आली आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top