संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

पुढील आठवड्यात उमा एक्सपोर्ट्स लिमिटेडचा आयपीओ येणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यात २८ मार्च रोजी मसाल्यांचा व्यापर करणाऱ्या उमा एक्सपोर्ट्स लिमिटेडचा IPO लॉन्च होणार असून ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून ६० कोटी रुपये उभारणार आहे.

२८ मार्च रोजी आयपीओ खुला झाल्यावर ३० मार्च ही शेवटची तारीख असेल. तर, चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात हा आयपीओ बंद होईल. कंपनी 7 एप्रिलला लिस्ट करण्याचा विचार करत आहे. दरम्यान, उमा एक्सपोर्ट्सने सप्टेंबर 2021 मध्ये बाजार नियामक SEBI कडे ड्राफ्ट पेपर सादर केले होते. 60 कोटी रुपयातील 50 कोटी रुपये वर्किंग कॅपिटलची गरज भागवण्यासाठी वापरले जातील. मार्च 2021 पर्यंत वर्किंग कॅपिटल सुविधांसाठी एकूण मंजूर मर्यादा 85 कोटी रुपये होती.

कंपनीविषयी माहिती

मसाले निर्मिती आणि मार्केटिंगसाठी ही कंपनी नावाजलेली आहे. कृषी उत्पादनांसह साखर, तिखट, हळद, धणे, जिरे, तांदूळ, गहू, मका, ज्वारी आणि चहा, कडधान्य आदी पदार्थ या कंपनीकडून बनवले आणि विकले जातात. ही कंपनी कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि म्यानमारमधून डाळी, फाबा बीन्स, काळी उडीद डाळ आणि तूर डाळ आयात करते. तर, या कंपनीचे उत्पादन श्रीलंका यूएई, अफगाणिस्तानला निर्यात केले जातात. उमा एक्सपोर्ट्स संपूर्ण मालकीच्या उपकंपनीद्वारे ऑस्ट्रेलियामध्ये कार्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे.

२०२१ मध्ये या कंपनीचे एकूण उत्पन्न ७५२.०३ कोटी रुपये होते. तर, एका वर्षापूर्वी ८१०.३१ कोटी रुपये होते. तसेच, २०२१च्या आर्थिक वर्षात या कंपनीला १२.१८ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. तर, कंपनीचा ऑपरेटिंग नफा २१.२५ कोटी रुपये होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami