- इराणचा फतवा
तेहरान
इराण सरकार हिजाबबाबतचे नियम अधिक कठोर करत करणार आहे. या नवीन नियमांनुसार हिजाब न घालणाऱ्या महिलांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याशिवाय हिजाब न घालणाऱ्या महिलांचा माग काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जाणार आहे. हिजाब न घालणाऱ्या महिलांसाठी 70,000 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. तसेच हिजाब न घालणाऱ्या महिलांना व्यवसाय सेवाही बंद करण्यात येतील. कोणी हिजाब न घालणाऱ्या महिलांना सेवा दिल्यास संभाव्य बंद आणि इतर गंभीर परिणामांचा इशारा इरानने दिला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकाला त्याच्या 3 महिन्यांच्या कमाईइतका दंड किंवा देशातून हाकलून देण्याची शिक्षा होऊ शकते. इराणच्या या नवीन नियमांना संयुक्त राष्ट्रांनी लिंगभेद असे म्हणत टीका केली आहे.
गेल्यावर्षी इराणमध्ये महसा अमिनी नावाच्या महिलेला नीट हिजाब न घातल्यामुळे मॉरल पोलिसांनी अटक केली होती. यानंतर देशात मोठ्या प्रमाणात हिजाबची निदर्शने सुरू झाली.16 सप्टेंबर 2022 रोजी, 22 वर्षीय महसा अमिनीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झाले. ह्या दिनी हिजाब ह्या ड्रेस कोडचे पालन न करणाऱ्या महिलांना सुरक्षा दलाचे अधिकारी तुरुंगात टाकणार आहेत.