मडगाव- गोव्यातील मडगाव येथील आके गावात असलेल्या प्रसिद्ध श्री बाल गणपती मंदिरात मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी सालाबादप्रमाणे गणेश जयंतीचे आयोजन केले आहे.
या गणेश जयंती उत्सवानिमित्त यादिवशी विशेष महापूजा, महाअभिषेक,सार्वजनिक गणेश मूर्तीचे आगमन व यजमान अंगद पैगिणकर यांच्या हस्ते मूर्तीची विधीवत स्थापना,गणहोम व पूर्णाहुती,आरती,तीर्थप्रसाद ,महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.त्याचप्रमाणे सायंकाळी मराठी भावगीते आणि सिनेगीते सादर केली जातील.तसेच दरवर्षीप्रमाणे या परिसरातील चार हायस्कूलमध्ये शिकणार्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे.रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महाआरती,उत्तरपूजा,तीर्थ प्रसाद,पावणी,आतषबाजी, बोरीच्या दिंडीसह श्रींची मिरवणूक आणि शेवटी तळीत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले जाईल.