Google ने लाँच केला स्वस्तात मस्त स्मार्टफोन, 5100mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह मिळतील अनेक शानदार फीचर्स

Google Pixel 9a Price-Specification | Google ने बहुचर्चित Pixel 9a स्मार्टफोन अखेर भारतात लाँच केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनची चर्चा होती. हा कंपनीच्या स्वस्त स्मार्टफोन्सपैकी एक असून, यामध्ये गुगलची इन-हाऊस Tensor G4 चिपसेट देण्यात आली आहे. फोनची किंमत फक्त 49,999 रुपये आहे. या फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Google Pixel 9a चे स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 9a स्मार्टफोन 6.3-इंच (1,080×2,424 पिक्सेल) Actua (pOLED) डिस्प्लेसह येतो. ही स्क्रीन 60Hz ते 120Hz रिफ्रेश रेट, 2700 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास 3 संरक्षणासह येते. नवीन Pixel 9a ड्युअल सिम सपोर्ट येतो. हा फोन Android 15 वर काम करतो. यामध्ये 4th जनरेशन Tensor G4 चिपसेट देण्यात आली आहे. 

गुगलच्या या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मात्र, मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट मिळत नाही. 

फोटो आणि व्हिडिओसाठी, Pixel 9a स्मार्टफोनमध्ये अपर्चर f/1.7, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), आणि 1/2-इंच सेन्सरसह 48-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेटअप मिळतो. कॅमेरा 8x पर्यंत Super Res Zoom सपोर्ट करतो. या हँडसेटमध्ये अपर्चर f/2.2 असलेला 13-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी अपर्चर f/2.2 सह 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Pixel 9a मध्ये 23W फास्ट चार्जिंग आणि 7.5W वायरलेस (Qi) चार्जिंग सपोर्टसह येणारी 100mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये बॅटरी 30 तासांहून अधिक टिकते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे. 

यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी, Pixel 9a मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.3, NFC, GPS, आणि USB 3.2 Type-C पोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये स्टीरियो स्पीकर्स आणि दोन मायक्रोफोन्स देखील आहे.

Google Pixel 9a ची किंमत

Google Pixel 9a च्या 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे, तर 8GB + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 56,999 रुपये खर्च करावे लागतील. काही ठराविक बँकेच्या कार्डवर 3 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळतो. याशिवाय, 24 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन एप्रिल 2025 पासून Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होईल.