Amazon कर्मचाऱ्यांना देणार मोठा धक्का, 14 हजार कामगारांना कामावरून काढणार

Amazon Layoffs | गेल्याकाही वर्षात प्रमुख टेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. आता वर्ष 2025 मध्ये देखील हाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेली Amazon लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देणार आहे. कंपनी लवकरच मॅनेजर पदावरील 14 हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. 

या कपातीमुळे कंपनीच्या (Amazon Layoffs 2025) जागतिक मॅनेजमेंट वर्कफोर्समध्ये जवळपास 13 टक्के घट होऊ शकते. तसेच, मॅनेजर्सची संख्या 105,770 वरून 91,936 वर येईल. वार्षिक खर्चात बचत करण्यासाठी कंपनीकडून हा निर्णय घेतला जात आहे. यामुळे 2.1 अब्ज डॉलर ते 3.6 अब्ज डॉलर दरम्यान वार्षिक खर्च कमी होण्याचा अंदाज आहे. 

कोविड महामारीच्या काळात Amazon च्या कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. 2019 मध्ये हा आकडा 798,000 कर्मचाऱ्यांपासून वाढून 2021 च्या अखेरीस 16 लाखांवर पोहोचला होता. कंपनीने त्यानंतर कामगार कपातीचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये मागील कपातीमुळे 2022 आणि 2023 मध्ये 27,000 नोकऱ्या कमी झाल्या आहेत. आता यावर्षी देखील कंपनी 4 हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे.

यापूर्वी कंपनीने कम्युनिकेशन आणि सस्टेनेबिलिटी विभागातही कपात केली होती. कंपनी असे करून आपले कामकाज पुन्हा व्यवस्थित करण्याचा आणि टीम्सची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करत आहे.