सेन्सेक्स ८० हजाराच्या पारसलग सातव्या दिवशी तेजी

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग सातव्या दिवशी तेजी टिकून राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज ८० हजार अंकांचा टप्पा पार केला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १६२ अंकांनी वाढून २४,३२९ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीमध्ये मात्र २७७ अंकांची घसरण होऊन तो ५५,३७० अंकांवर बंद झाला.आज सेन्सेक्स जोरदार वाढीसह ८०,१४२.०९ अंकावर उघडला.व्यवहारादरम्यान तो ८०,२५४.५५ अंकांवर पोहोचला होता. शेवटी दिवसअखेर तो ५२१ अंकांच्या वाढीसह ८०,११६ अंकांवर बंद झाला.निफ्टी-५० देखील आज २४,३०० अंकांच्या वर जोरदार वाढीसह उघडला. व्यवहारादरम्यान तो २४,३५९.३० अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेवटी १६२.७० अंकांच्या वाढीसह तो २४,३२९ अंकावर स्थिरावला.