शेअर बाजारात तेजी कायम सेन्सेक्स २५३ अंकांनी वाढला

मुंबई :

शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. सेन्सेक्स २५३ अंकांनी वाढून ७३,९१७ वर बंद झाला. तर निफ्टी ६२ अंकांच्या वाढीसह २२,४६६ वर स्थिरावला. आजच्या ट्रेंडिंग सत्रात बीएसई मिडकॅपने नवा विक्रमी उच्चांक नोंदवला. तर स्मॉलकॅप कंपनीचे शेअर देखील उच्चांकाजवळ पोहले होते. बीएसई मिडकॅप १.१ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप १.३ टक्क्यांनी वाढून बंद झाला. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झाल्यानंतर शेअर बाजारात घसरणीबरोबरच चढ-उतार प्रचंड दिसून आला.

एम अँड एमच्या शेअरने ५ टक्क्यांनी वाढून २,५०६ रुपयांवर व्यवहार केला. त्याचसोबत जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, एनटीपीसी, टाटा मोटर, मारुती, आयटी हे शेअरही वाढले. तर टीसीएस, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअरमध्ये घसरण दिसून आली. एनएसई निफ्टीवर एम अँड एम, ग्रासीम, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, बीपीसीएल हे शेअर टॉप गेनर राहिले. तर सिप्ला, टीसीएस, एचसीएल टेक, एसबीआय लाईफ, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर घसरले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top