अयोध्या
अयोध्येत होणाऱ्या राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनेक पाहुणे आता अयोध्येत दाखल होत आहेत. तथापि रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका केलेल्या सुनील लहरी यांना मात्र आता अयोध्येत हॉटेलमध्ये एकही खोली मिळत नसल्याचे वृत्त आहे.
८० च्या दशकात दूरदर्शनवर आलेल्या रामायण या मालिकेने लोकप्रियतेचे अक्षरशः अनेक विक्रम मोडले होते. या मालिकेत राम, लक्ष्मण आणि सीतेच्या भूमिका केलेल्या कलाकारांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यामुळे अयोध्येत होणाऱ्या राममंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी हे तीन्ही कलाकार दोन दिवसांपूर्वीच अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यातल्या लक्ष्मणाची भूमिका केलेल्या सुनील लहरींना सध्या अयोध्येत मुक्काम करण्यासाठी हॉटेलमध्ये एकही खोली मिळत नसल्याचे वृत्त समोर आले आहे. रामानेच आपल्याला या सोहळ्यासाठी बोलावले आहे तर पुढची काळजीही रामच घेईल असे त्यांनी याबाबत म्हटले आहे.