मुंबई- लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये अति आत्मविश्वास आला होता. हे माझे वैयक्तिक मत मांडत आहे. काँग्रेसचे लोक तर कोणते मंत्रिपद, खाते मिळणार याच्यावर चर्चा करत होते हे सत्य आहे. मुख्यमंत्रिपदासाठी तर १० जण इच्छुक होते. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर झाले असते तर ४-५ टक्के मते वाढली असती. काँग्रेसला जर त्यांचा मुख्यमंत्री हवा होता तर त्यांनी नाव जाहीर करायला हवा होता. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी तुम्ही नाव जाहीर करा, मी पाठिंबा देतो म्हटले होते, असे ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले.
स्वबळावर निवडणूक लढण्यावर अंबादास दानवे म्हणाले की, काल मी आपली ताकद निर्माण केली पाहिजे अशी भूमिका मांडली. स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागले पाहिजे असे मी म्हटले होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहिजे असे मी म्हटलेले नाही.
पालिका निवडणुकीच्या वेळी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर ते म्हणाले की, मनसेला सोबत घेण्यासंदर्भात आमच्या पक्षात शून्य टक्के चर्चा आहे. मनसेला आम्ही त्यांना साद घालू ,असे मला वाटत नाही.