अतिरिक्त लेन आणि ट्रॅफिक ब्लॉक
पिंपरी, ता. २२ – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलीसांनी नवा पर्याय शोधला आहे. मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी विरुद्ध बाजूची अतिरिक्त लेन देण्यात आली आहे. तसेच रस्त्यावरून जड वाहतूक सुरळीत होण्यासाठी पाच ट्रॅफिक ब्लॉकही लागू करण्यात आले आहेत.
शनिवार आणि रविवारी सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. ही वाहतूक कोंडी सोडवण्य़ासाठी महामार्ग पोलीसांनी नवा पर्याय शोधला आहे. रविवारी मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी विरुद्ध बाजूची अतिरिक्त लेन देण्यात आली आहे. तसेच पाच ट्रॅफिक ब्लॉकही लागू करण्यात आले होते.
महामार्गावरील ४४/१०० ते ४६/८०० स्थानापर्यंत विरुद्ध बाजूची लेन तयार करण्यात आली होती. त्यामुळे ट्राफिक ब्लॉग लावल्यामुळे एकावेळी १,३०० ते १,४०० वाहने सोडण्यात पोलीसांना यश आले. याबाबत बोलताना अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. रविंदर सिंगल म्हणाले की, “मुंबईवरून पुण्याकडे येणाऱ्या गाड्यांची मोठी संख्या, हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे, वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेषत: सुटीच्या दिवशी पुण्याला अतिरिक्त लेन देण्यात आली. जड वाहतुकीसाठी पाच ट्रॅफिक ब्लॉक लागू केले. तुमची सुरक्षा ही आमची प्रथम जबाबदारी आहे. त्यामुळे पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील रस्ते सुरळीत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”