मुंबई – मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने बुधवारी ‘नो हॉंकिंग डे’ मोहीम राबवली. या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र २,११६ चालक विनाकारण हॉर्न वाजवताना आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मुंबई शहरात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवली.
मुंबईत वाहनांमुळे होणारे ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस शाखेने ‘नो हॉंकिंग डे’ ही विशेष मोहीम राबवली. त्यानुसार बुधवारी सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना नो हँकिंगचे चिन्ह दाखवून हॉर्न न वाजवण्याची विनंती केली. याला चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आवाजाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र २,११६ चालक विनाकारण हॉर्न वाजवताना सापडले. त्यांच्यावर ई-चलनाची कारवाई करण्यात आली आहे.