नवी दिल्ली –
‘ट्विटर’चे सह-संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी नवीन सोशल प्लॅटफॉर्म अॅप्लिकेशन लाँच केले आहे. ‘ब्ल्युस्काय’ हे अॅप अगदी ट्विटरसारखे दिसते. डॉर्सीचे ‘ब्लूस्काय’ अॅप ‘ट्विटर’सारखेच आहे. त्याचा रंगही ‘ट्विटर’सारखाच आहे. यात लोकांना मायक्रो ब्लॉगिंगची सुविधाही मिळते. याशिवाय यूजर्स इथे येऊन ट्विट आणि फॉलो करू शकतात. हे अॅप ट्विटरला स्पर्धा समजले जात आहे.
जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. आता ‘ब्लूस्काय’ लॉन्च करून ते ट्विटरला कडवे आव्हान दिले. ‘ट्विटर’ विकत घेतल्यानंतर एलोन मस्कने त्यासाठी सशुल्क पडताळणी सेवा जाहीर केली. लोकांना आता ट्विटरवर ‘ब्लू टिक’ पैसे द्यावे लागतील. कंपनी केवळ ‘ब्लू टिक’साठीच नाही तर अनेक सेवांसाठी हे शुल्क घेते. अलीकडे ‘ट्विटर’ने सामान्य युजर्ससाठी ‘टेक्स्ट बेस्ड ऑथेंटिकेशन सिस्टम’देखील समाप्त केली