टोकियो –
जपानच्या फुकुशिमा अणू प्रकल्पातून निघणारे सांडपाणी समुद्रात सोडण्यात येत असल्याने चीनमध्ये संतापाची लाट आहे. सांडपाणी प्रक्रिया करून सोडले जात असले तरी चिनी नागरिक याला जोरादार विरोध केला आहे. विरोधाचा भाग म्हणून चीनमधील नागरिकांनी जपानी सौंदर्यप्रसाधन उत्पादनांचा बहिष्कार घातला आहे.
चिनी नागरिकांनी या संदर्भात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. तिच्या माध्यामातून जपानच्या सौंदर्यप्रसाधन कंपन्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. या मोहिमेला ३० कोटींहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. जपानी कंपन्यांच्या उत्पादनांची यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
चीनमध्ये जपानी कंपन्यांच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री जवळपास बंद झाली आहे. चीनच्या दुकानांमध्ये जपानी कॉस्मेटिक्सची विक्री होत नसल्याने त्यांचा साठा पडून आहे. यामुळे सौंदर्य प्रसाधने बनवणारी जपानची प्रमुख कंपनी शिसीदोच्या शेअरमध्ये ६.८ वटक्के इतकी घसरण झाली आहे. पोला ऑर्बिसर्बी होल्डिंग्ज व कोस कॉर्पसह अन्य कॉस्मेटिक कंपन्यांचे शेअरही ३ टक्क्यांपेक्षा जास्त कोसळले आहे. हा बहिष्कार कायम राहिला, तर जपानी ब्रँड्चे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. जपानी कच्च्या मालाचा वापर करणाऱ्या चिनी ब्रँडवरही बहिष्कार टाकला जात आहे.