खासदार सुप्रिया सुळेंचे दौंड ते यवत लोकल प्रवास

पुणे :

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकलने प्रवास केला. दौंड ते यवत असा त्यांनी लोकलनी प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

देशात १९ एप्रिल ते १ जून असे ७टप्प्यात तर महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष पक्ष बांधणीसाठी प्रयत्नशील आहे. सभा, बैठका, मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे लोकांशी संवाद साधताना दिसल्या. त्यांनी सर्व सामान्याप्रमाणे लोकलमधून प्रवास केला. प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी सुळेंनी काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पक्षचिन्हाची शॉल गळ्यात घातली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top