iPhone 15 Offer: नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर iPhone 15 खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहे. 80 हजारांच्या या फोनला तुम्ही फक्त 24 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. आयफोन 15 वरील या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.
iPhone 15 वरील ऑफर
आयफोन 15 ची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. मात्र, फोनचे 128 जीबी मॉडेल Amazon वर सध्या 23 टक्के डिस्काउंटसह 61,499 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, यावर एक्सचेंज ऑफरचाही फायदा मिळतो.
या फोनवर 36,400 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनवर अवलंबून आहे. पूर्ण ऑफरचा लाभ मिळाल्यास फोनची किंमत कमी होऊन 25 हजार रुपयांवर येते. याशिवाय फोनवर कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध आहे. या ऑफरचा फायदा मिळाल्यास iPhone 15 ला 24 हजारात खरेदी करता येईल.
iPhone 15 चे वैशिष्ट्ये
iPhone 15 मध्ये 6.4 इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन 2532X1170 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. फोन Apple A16 Bionic चिपसेटसह येतो. यामध्ये एफ/1.5 अपर्चरसह येणारा 46 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एफ/2.4 अपर्चरसह 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स दिली आहे. सेल्फासाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.