मुंबई – येत्या मंगळवारी २१ रोजी जानेवारी रोजी रात्रीच्यावेळी अवकाशात ग्रहांचा एक सुंदर खेळ रंगणार आहे. रात्री सहा ग्रह मंगळ,गुरू,युरेनस, नेपच्यून,शुक्र आणि शनी एका रेषेत दिसतील.
या सहा ग्रहांपैकी मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी हे चार ग्रह दुर्बिणीशिवाय स्पष्टपणे दिसतील. मात्र नेपच्युन व युरेनस या दूरस्थ ग्रहांना स्पष्टपणे पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज भासणारआहे.लालसर मंगळ ग्रह पूर्वेकडे मिथुन राशीत दृग्गोचर होईल. चमकदार गुरू ग्रह त्याच्यापेक्षा थोड्या अधिक उंचीवर वृषभ राशीत दिसेल.युरेनस हा ग्रह त्याच्या कडेला मेष राशीत दिसून येईल.पुढील तीन ग्रह पश्चिमेच्या जवळ दिसून येतील. नेपच्युन मीन राशीत असेल; पण तो पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज भासू शकते.पिवळसर शनी व तेजस्वी शुक्र सहजपणे दिसून येतील.ते कुंभ राशीत असतील.