पणजी- गोव्यात १०० द्या आणि माझ्यासोबत सेल्फी काढा, असा अनोखा उद्योग एका रशियन तरुणीने सुरु केला आहे. विदेशी लोकांना आपल्या भारतीय संस्कृतीविषयी प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळेच दरवर्षी हजारो पर्यटक भारतात येतात. पण या विदेशी लोकांना बघून काही भारतीय लोक त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्यांना त्रास देतात. अँजलिना नावाची एक रशियन तरुणी गोव्यामध्ये फिरयाला आली असताना लोक तिच्याभोवती गर्दी करून सतत तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा आग्रह करत होते. सर्वांसोबत सेल्फी काढून काढून ती इतकी वैतागली की, अखेर तिने यापासून वाचण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढली. १०० रुपये द्या आणि सेल्फी काढा, असा बोर्डच तिने बनवला. हा बोर्ड गळ्यात घालूनच ती फिरू लागली. पण लोकांनी १०० रुपये देऊन तिच्यासोबत सेल्फी काढले. त्यामुळे आता तिची दिवसभर हजारो रुपयांची कमाई होत आहे.
१०० रुपये द्या! सेल्फी घ्या! विदेशी तरुणीचा गोव्यात फंडा
