मनाली- हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात ‘देव प्रथा’ मोठ्या प्रमाणात आहे. याच परंपरेतून मकर संक्रांतीपासून जिल्ह्यातील ९ गावांमध्ये गावकर्यांनी पुढील ४२ दिवस टीव्ही, मोबाईल आणि मंदिरातील पूजेवर बंदी घातली आहे.
या गावांमध्ये आता पुढील ४२ दिवस गावकऱ्यांचे मोबाइलही सायलेंट मोडवर राहतील.कोणाचीही रिंगटोन ऐकायला येणार नाही. देवी देवतांच्या आदेशावर ४२ दिवसांसाठी दरवर्षी ही प्रथा न चुकता गावकरी पाळतात.मनालीतील गावांसोबतच गौशाल परिसरातील ८ गावांमध्येही देव आदेश जारी झाले आहेत.याठिकाणी टीव्ही, मोबाईल आणि मंदिरातील घंटी वाजवण्यासही निर्बंध आहेत.उझी घाटीतल्या ९ गावांमध्ये हजारो वर्षापासून ही प्रथा सुरू आहे.या ४२ दिवसांच्या काळात या गावांमधील कुणीही गावकरी एकमेकांशी मोठ्या आवाजात बोलत नाही. मंदिरात पूजा केली जाणार नाही.या काळात देवळातील घंटीही बांधून ठेवली जाते.
आराध्य देवता गौतम ऋषी,
व्यास ऋषी आणि नागदेवता यांच्याकडून हे देव आदेश जारी केले जातात.मकर संक्रांतीच्या नंतर देवी देवता त्यांच्या तपस्येत गुंग होतात.अशा वेळी देवी देवतांना शांत वातावरण हवे असते. त्यामुळे अशाप्रकारे हे निर्बंध घातले जातात.