नवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान झिंक लिमिटेड (एचझेडएल) मधील उर्वरित २९.५४ टक्के भाग विक्रीसाठी सरकार या महिन्यात अमेरिकेतून आंतरराष्ट्रीय रोड शो सुरू करण्याची शक्यता आहे.
सरकारने गेल्या वर्षी या कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, परंतु फर्मचे मालक अब्जाधीश अनिल अग्रवाल यांच्या वेदांत लि.च्या प्रस्तावामुळे या योजनेला अडथळा निर्माण झाला होता. वेदांत प्रस्तावाची मुदत गेल्या महिन्यात संपली त्यामुळे आता सरकार स्वतःची योजना पुढे नेण्याचा विचार करत आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट आता या कंपनीतील हिस्सा विक्रीसाठी ऑफर फॉर सेल (ओएफएस) लवकरात लवकर आणण्याचा विचार करत आहे. उर्वरित हिस्सा संस्थात्मक तसेच सार्वजनिक गुंतवणूकदारांना विकला जाईल, असे सांगितले जात आहे.
हिंदुस्तान झिंकसाठी आंतरराष्ट्रीय रोड शो
