शेअर बाजारात जबरदस्त तेजी! सेन्सेक्स प्रथमच ८३ हजार पार

मुंबई – भारतीय शअर बाजारात आज जबरदस्त तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांच्या जोरदार खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच ८३ हजाराच्या पार गेला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीनेही २५,४३३ अंकांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला.
सेन्सेक्समध्ये आज दिवसभराच्या व्यवहारात १६०० अंकांची तर निफ्टीमध्ये ५०० अंकांची वाढ झाली होती. भारतीय शेअर बाजारातील या उसळीचे श्रेय जागतिक शेअर बाजारातील वाढीला दिले जाते. याशिवाय बँकिंग, एनर्जी, ऑटोमोबाईल आणि आयटी क्षेत्राचेही या वाढीमध्ये महत्त्वाचे योगदान राहिले.
बाजार बंद होताना सेन्सेक्स १४४० अंकांच्या वाढीसह ८२,९६२ अंकांवर, तर निफ्टी ४७० अंकांच्या वाढीसह २५,३८९ अंकांवर बंद झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top